आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात भरपूर खा खरबूज, हे आहेत खाण्याचे BIG BENEFITS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरबूजामध्ये ९५ टक्के पाण्यासोबतच व्हिटॅमिन्‍स आणि मिनिरल्सचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. खरबूजामध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन शरीरासाठी लाभदायक राहते. पिकलेल्या खरबुजातील गर शीतल, शक्तिवर्धक, कामोत्तेज असतो. वात, पित्त व थकवा दूर करण्यास या फळांचा गर उपयुक्त ठरतो. आज आम्ही तुम्हाला खरबुजाचे काही खास फायदे आणि उपाय सांगत आहोत.
त्वचा तजेलदार राहते
खरबूजामध्ये अ‍ँटी ऑक्‍सीडेंट, व्हिटामिन्‍स 'सी' व 'ए' मोठ्या प्रमाणात असतात. याच्या नियमित सेवनाने त्वचा टवटवीत राहते.