आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेवताना या 9 गोष्टी लक्षात ठेवल्यास आजारी पडणार नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी शरीरासाठी आणि आजारापासून दूर राहण्यासाठी दैनंदिन आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आहार पचण्यास हलका असावा. खूप गरम-गरम आणि उशिरा पचणारे पदार्थ व्याधींना आमंत्रण देतात. येथे जाणून घ्या, जेवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे...

जमिनीवर बसून जेवण करावे
प्राचीन प्रथेनुसार आपण जमिनीवर बसून जेवण केले पाहिजे, परंतु आज या प्रथेचे पालन फार कमी लोक करतात. भौतिक सुख-सुविधांच्या हव्यासापोटी मनुष्याने प्राचीन प्रथांकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक लोक जीवन स्तर उच्च ठेवण्यासाठी आणि दाखवण्यासाठी टेबल-खुर्चीवर बसून जेवण करतात. प्राचीन काळात राजे-महाराजेसुद्धा जमिनीवर बसून जेवण करीत होते. जमिनीवर बसून जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

जमिनीवर जेवण करण्यसाठी बसल्यानंतर आपण एका विशेष योगासनाच्या स्थितीमध्ये बसतो. या आसनाला सुखासन म्हणतात. सुखासन हे पद्मासनाचे एक रूप आहे. सुखासनात बसून जेवल्याने शरीराच्या अवयवांची योग्य नैसर्गिक स्थिती असल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होते. टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने शरीराच्या अवयवांची नैसर्गिक स्थिती योग्य नसल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होत नाही त्यामुळे अपचन, गॅस, लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते.

जेवण चावून चावून करावे
वजन कमी करू इच्छित असलेल्या लोकांनी जेवणाचा प्रत्येक घास कमीत-कमी 30-35 वेळेस चावून खाणे आवश्यक आहे. अनेकदा पौष्टिक आणि संतुलित आहार घेताना लोक घाई-गडबडीत 10-15 वेळेसच अन्न चावतात. यामुळे पोटाच्या समस्या सुरु होतात. अन्न चावून-चावून खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते, दात मजबूत होतात आणि अपचन होत नाही.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, जेवण करताना इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...
बातम्या आणखी आहेत...