Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Eating Watermelon In Summer Know Health Benefits

उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे हे चमत्कारिक फायदे कदाचित माहिती नसतील तुम्हाला

जीवनमंत्र डेस्क | Apr 20, 2017, 08:12 AM IST

कडक उन्हात बाहेर पडताच थकवा आणि ऊर्जेची कमतरता वाटू लागते. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जा सुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून देणार्‍या फळांना उन्हाळ्यात विशेष मागणी असते. उन्हाच्या काहिलीपासून गारवा देणार्‍या हंगामी फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहू शकते. येथे जाणून घ्या, टरबूजाचे खास आरोग्यदाय फायदे आणि घरगुती उपाय.

- टरबूजामध्ये 90 टक्के पाणी असते. हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन्स 'ए' आणि 'सी' देखील असतात. टरबूज असेच खाता येते किंवा त्याचा ज्यूसदेखील करता येतो. फ्रूट सॅलडमध्येदेखील कलिंगड ठेवता येते.

- टरबूज रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि लठ्ठपणासुध्दा कमी करते. जे लोक सतत कामाच्या तणावात राहतात त्यांच्यासाठी टरबूर गुणकारी आहे. त्यामुळे डोके शांत आणि मन प्रसन्न राहते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना टरबूज खाल्ल्यानंतर राग शांत करण्यास मदत होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, टरबूज खाण्याचे इतर काही खास फायदे...

Next Article

Recommended