आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही एक्सरसाइज केल्‍यानंतर कमी होते चरबी, तंदुरुस्त होते प्रकृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थूलता ही सध्या जगातली मोठी अडचण होऊन बसली आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहाण्यासाठी शरीरातील फक्त चरबीचं प्रमाण कमी करणे, याकडे अवघड गोष्‍ट म्‍हणून पहिले जाते. मात्र महिलांमध्‍ये फॅट्स सर्वात जास्‍त कंबरेच्‍या भागामध्‍ये असतात. यामुळे कंबर मोठी दिसते. कंबरेतील चरबी कमी करण्‍यासाठी खालील उपाय नियमित केले तर चरबी लवकर कमी होते.
सायकल क्रंचेज-

पाठीच्‍या भागाकडून जमिनीवर झोपा. दोन्‍ही हात डोक्‍याच्‍या पाठीमागे ठेवा. आता शरिराचा वरचा भाग उजव्‍या बाजूला घ्‍या. डावा पाय वर उचला. शरिराच्‍या मधोमध हे दोन्‍ही भाग एकमेकाजवळ घ्‍या. ही क्रिया परत-परत करा. एका वेळेला कमीतकमी दहा वेळेस हा प्रयोग करा.
हिप रोलर-
जमिनीवर सरळ झोपा. पाय गुडघ्‍यामधून दूमडा. डाव्‍या बाजूला शरिर कलवा. थोडावेळ या अवस्‍थेत थांबा. दुस-या बाजूने परत ही प्रक्रिया करा. यावेळी हिप ट्विस्‍ट होते. हा प्रयोग कमीत-कमी दहा वेळा केल्‍यानंतर चरबी कमी होते.
रिवर्स क्रंचेज-
जमीनवर सरळ झोपा. हाथ जमीनीवर सरळ ठेवा. नंतर गुडघ्‍यापासून पाय दुबडून गुडघे पोटाला चिकटवा. थोडा वेळ या आवस्‍थेमध्‍ये थांबून पाय वरती उचला. नंतर परत पाय सरळ करा व जमिनीवर ठेवा. हा प्रयोग दहा वेळा केल्‍यानंतर चरबी कमी होते.