आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टनरसोबत व्यायाम करण्याचा फायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा मित्र किंवा पार्टनरसोबत व्यायाम करणे अत्यंत उत्साहवर्धक ठरते. या व्यायामादरम्यान दोघेही परस्परांना सहकार्य करतात. शक्तीचे जास्त प्रदर्शन करतात. दररोज आपल्या एक्झरसाइज प्रोग्राममध्ये पाच मिनिटे वाढवणे फारसे अवघड नसते. दोघांचीही फिटनेस लेव्हल वेगळी असेल तर पार्टनरची बरोबरी करण्यासाठी स्वत:च्या शरीराला फार त्रास देऊ नका. उदाहरणार्थ स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्झरसाइजदरम्यान दोघांची क्षमता व सोयीनुसार वजन उचलावे. आपला पार्टनर पुरुष असेल आणि जास्त वजन उचलण्यात सक्षम असेल तर त्याला एकट्यालाच ते करायला सांगा. त्यादरम्यान आपण क्रंचीज करू शकता. सर्वच व्यायामप्रकार सोबत करण्याची आवश्यकता नाही. व्यायाम करताना अपघात होऊ नये म्हणून एकमेकांपासून थोडे अंतर ठेवूनच व्यायाम करावा. उदाहरणार्थ चालताना किंवा धावताना थोडे अंतर ठेवल्यास टक्कर होण्याची शक्यता टळते.

पार्टनरसह काही व्यायामप्रकार करता येतात. परस्परांपासून 3 ते 4 फूट अंतरावर उभे राहावे आणि मेडिसीन बॉल घेऊन एकमेकांकडे पास करावा. 5 ते 10 मिनिटे हा व्यायाम करावा. परस्परांना पाहत खाली झोपावे. दोघांचेही पाय परस्परांच्या दिशेने असतील अशा रीतीने गुडघे दुमडावेत. याच स्थितीत सिटअप करा. हे सोबत करा. वर येताना हाय-फाइव्ह करावे. परस्परांकडे पाठ करून उभे राहावे. मेडिसीन बॉल एकमेकांकडे पास करावा. गोल फिरून चेंडू पकडावा. आपण चेंडू ओव्हरहेड पास करूनही पकडू शकता. - प्रिव्हेन्शन नियतकालिकातून

निशा वर्मा, रिबॉक फिटनेस सेंटर, नवी दिल्ली