Home | Jeevan Mantra | Dharm | Facts About Drinking Water

PHOTOS : पाण्याशी निगडीत या वाईट सवयी तुमच्यासाठी घातक ठरू शकतात!

धर्म डेस्क | Update - Dec 03, 2013, 12:57 PM IST

जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

 • Facts About Drinking Water

  जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. पाणी आपल्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. दिवसभर भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक अर्थांनी गरजेचे आहे. कारण यावरच तुमची कार्यप्रणाली अवलंबून असते.

  त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी पुढील गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या...

 • Facts About Drinking Water

  भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशा अङ्गताम!!

  जेवणाच्या वेळी अन्न ग्रहण करण्यापूर्वी पाणी पिल्यास ते पाणी अग्निमांद्य उत्पन्न करते ज्यामुळे अन्न पचण्यास बाधा निर्माण होते.

 • Facts About Drinking Water

  अन्ते करोति स्थूल्त्वमूध्र्वएचामाशयात कफम!

  जेवणाच्या शेवटी लगेच पाणी पिल्याने शरीरात स्थूलता आणि अमाशयाच्या वरील भागामध्ये कफ जमा होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जेवण झाल्यानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिल्यास लठ्ठपणा वाढतो.

 • Facts About Drinking Water

  मध्येमध्यान्ग्तामसाम्यं धातूनाम जरणम सुखम!!

  जेवणाच्या मध्ये थोड्या प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी चांगली सवय आहे. आयुर्वेदानुसार जेवण करताना थोडे पाणी पिल्यास अन्न योग्य पद्धतीने पचण्यास मदत होते.

 • Facts About Drinking Water

  अतियोगेसलिलं तृषय्तोपि प्रयोजितम!

  तहान लागल्यास लगेच भरपूर
  प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी नुकसानदायक आहे. तहान लागल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिल्यास पित्त आणि कफ दोष निर्माण होऊ शकतो.

 • Facts About Drinking Water

  प्रयातिपित्तश्लेष्मत्वम्ज्वरितस्य विशेषत:!!

  आयुर्वेदानुसार शरीरात ज्वर (ताप)  असलेल्या व्यक्तीने जास्त प्रमाणात पाणी पिल्यास आमदोष उत्पन्न होतो. यामुळे तंद्री, अंग जड पडणे, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्यता वाढते.

 • Facts About Drinking Water

  आमविष्टबध्यो :कोश्नम निष्पिपासोह्यप्यप: पिबेत!

  आमदोषामुळे उत्पन्न झालेल्या आजारांमध्ये तहान लागल्यानंतर कोमट पाणी प्यावे.  
  आमदोषामध्ये अजीर्ण, अ‍ॅसिडीटी असे आजार उत्पन्न होतात.

 • Facts About Drinking Water

  बिबद्ध : कफ वाताभ्याममुक्तामाशाया बंधन:!
  पच्यते क्षिप्रमाहार:कोष्णतोयद्रवी कृत:!!


  कफ आणि वायुमुळे पोटातील ज्या अन्नाचे पचन झाले नाही ते अन्न बाहेर पडते. परंतु कोमट पाणी पिल्यास ते अन्न व्यवस्थितरीत्या पचते.
  (सर्व संदर्भ सूत्र अष्टांग संग्रहातील ६ व्या अध्यायातील आहेत.)

Trending