आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • November 13 Will Be A Half Dozen Good Yoga Raja Yoga Also With Pushya

आज जुळून येत आहेत अर्धा डझन शुभ योग, पुष्यसोबत राजयोगही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार 13 नोव्हेंबर गुरुवारचा दिवस खूप खास राहील, कारण या दिवशी विविध शुभ योग जुळून येत आहेत. उज्जैनचे पं. विनय भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्य, सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, गजकेसरी, लक्ष्मी योगासोबतच राज योगही जुळून येत आहे. एका दिवसात एवढे शुभ योग जुळून येणे दुर्लभ आहे. अनेक वर्षांमध्ये एकदाच असे योग जुळून येतात.

पं. भट्ट यांच्यानुसार 12 नोव्हेंबरला बुधवारी संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्र समाप्त होताच पुष्य नक्षत्र सुरु होईल. हे नक्षत्र दुसर्या दिवशी(13 नोव्हेंबर) रात्री 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत राहील. अशा प्रकारे गुरुवारी दिवसभर पुष्य नक्षत्र असल्यामुळे गुरुपुष्य योग जुळून येत आहे. या दिवशी चंद्र स्वराशी कर्कमध्ये राहील. वर्तमानात गुरु सध्या कर्क राशीतच स्थिती आहे. एकाच राशीत गुरु आणि चंद्राची युती असल्यामुळे गजकेसरी नावाचा योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त चंद्रावर मंगळाची आठवी दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. हा दिवस सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्धीच्या संयोगाने अधिकच खास झाला आहे.

का शुभ आहे गुरुपुष्य योग...
ज्योतिष शास्त्रात पुष्य नक्षत्राला शुभ नक्षत्र मानले जाते. देवतांचे गुरु बृहस्पती या नक्षत्राचे स्वामी आहेत. गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राचा संयोग गुरुपुष्य नावाचा शुभ योग तयार करतो. या योगामध्ये खरेदी, बँकेशी संबंधित कार्य, नवीन व्यापार-ऑफिसची सुरुवात, पूजन कर्माशी संबंधित शुभ कार्य केले जातात. शास्त्रानुसार या मुहूर्तावर खरेदी केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो.

गुरुपुष्य तसेच इतर शुभ योगांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)