Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | hair loss health problem

PHOTOS : केस गळणे हा आजारपणाचा संकेत

दिव्य मराठी | Update - Feb 12, 2013, 08:13 AM IST

महिलांचे केस गळण्यामागे अनेक कारणे असतात, पण काहीवेळा हा आजारपणाचा इशारासुद्धा असू शकतो.

 • hair loss health problem

  महिलांचे केस गळण्यामागे अनेक कारणे असतात, पण काहीवेळा हा आजारपणाचा इशारासुद्धा असू शकतो. या इशा-याकडे वेळीच लक्ष देत पहिल्यापासून सतर्क राहणे योग्य ठरते. केसाची समस्या दूर करायची असल्यास समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा ही समस्या कधी दूर होणार नाही, असे या विषयातील जाणकारांचे मत आहे.

 • hair loss health problem

  विरळ केस
  केस वाढीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ते  रेस्टिंग पिरियडमध्ये जात असल्यास  केसाचा विकास होत नाही. अशाने केस अवेळी गळू लागतात. परिणामी केस विरळ होत जातात.
  कारण : तणाव, चयापचयसंबंधी तक्रारी, मधुमेह आणि शरीरात लोहतत्त्वाच्या कमतरतेने ही समस्या निर्माण होते. लोहतत्त्व  केसांसाठी आरोग्यदायी असते.

 • hair loss health problem

  बाल्ड पॅचेस
  जेव्हा डोक्याच्या कोणत्याही भागातील केस गळल्यामुळे त्वचेवर नाण्याच्या आकाराचा भाग मोकळा दिसू लागतो तर त्याला ‘बाल्ड पॅचेस’ म्हणतात.
  कारण : एखादा संसर्ग किंवा तणावाने पीडित असल्यास शरीराच्या सुरक्षा पेशी हेअर फॉलिकल्सवर हल्ला  करू लागतात. अशा स्थितीत हेअर फॉलिकल्स केसांची वाढ होण्याची  प्रक्रिया कायम स्वरूपात प्रभावी करतात. ही प्रक्रिया कोणत्याही वयात घडू शकते.

 • hair loss health problem

  फीमेल पॅटर्न बाल्डनेस
  ही समस्या महिलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात उद्भवते. भांग पाडत असलेल्या ठिकाणी किंवा त्याच्या आसपासच्या भागातील केस कमी होतात.
  कारण : ही समस्या अनुवांशिक स्वरूपाची आहे; परंतु रजोनिवृत्तीनंतर महिलांना या समस्येचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो. या काळात शरीरात अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन्सच्या अनियमितपणामुळे असे होते.

Trending