Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | hair oil information

PHOTOS : खोब-याच्या तेलाचे काही मुलायम उपयोग असेही...

दिव्य मराठी | Update - Feb 09, 2013, 02:00 AM IST

केस लांब, दाट आणि सुंदर बनवण्यासाठी खोब-याचे तेल जास्त वापरले जाते. मात्र, खोब-याच्या तेलाचे लाभ केसांपुरतेच मर्यादित नाहीत.

 • hair oil information

  केस लांब, दाट आणि सुंदर बनवण्यासाठी खोब-याचे तेल जास्त वापरले जाते. मात्र, खोब-याच्या तेलाचे लाभ केसांपुरतेच मर्यादित नाहीत. हे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करते. त्याचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो. ते रोज लावल्यास त्वचेवरील डागांचा रंग निवळू लागतो. यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात सुरक्षित राहतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनते. कामा आयुर्वेदाचे सल्लागार आयुर्वेदिक डॉक्टर अवलोचनसिंह यांनी खोब-याच्या तेलाचे पुढीलप्रमाणे काही फायदे सांगितले आहेत...

 • hair oil information

  हातांचे सौंदर्य खुलवा
  खोब-याच्या तेलाने त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते. हे तेल अँटिसेप्टिकही आहे. जखमेवर किंवा भाजलेल्या जागेवर लावल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. दररोज झोपण्यापूर्वी हातांना तेल लावल्यास हात सुंदर होतील. रोज लावल्यामुळे ते त्वचेत खोलवर झिरपते. त्यामुळे कोरडेपणा किंवा संसर्गाची शक्यता कमी होते.

 • hair oil information

  चिकबोन हायलाइट करा
  खोब-याचे तेल लावल्याने त्वचा मॉइश्चराइझ होते, तसेच रंगही उजळतो. मेकअप केल्यानंतर खोब-याच्या तेलाचे एक-दोन थेंब हातांवर घेऊन गालांवर चोळल्यास चेह-यावर चमक येते.

 • hair oil information

  मुलायम त्वचेसाठी
  दोन चमचे तांदळाच्या पिठात दोन चमचे सेमोलिना आणि खोब-याचे तेल घाला. यात पाच चमचे दूध टाका. हे मिश्रण पाच मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर अंगाला लावा. आठवड्यातून चार दिवस असे केल्यास त्वचा मुलायम होईल. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा अजिबात सतावणार नाही. क्रीमऐवजी खोब-याच्या तेलाने त्वचेवर मालिश केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. तसेच चेहराही उजळतो.

 • hair oil information

  मेकअप काढणे सोपे
  वॉटरप्रूफ मस्कारा काढताना ब-याचदा त्रास होतो.  अशा वेळी कॉटनवर खोब-याचे तेल लावून डोळ्यांचा मेकअप काढावा. या तेलाने वॅक्स, वॉटरप्रूफ मेकअप सहज काढता येतो. त्वचेमधील आर्द्रता टिकून राहते. मेकअप काढल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. असे केल्यास डार्क सर्कलच्या समस्येतून सुटका होईल.

 • hair oil information

  केसांची चमक वाढवा
  केसांची चमक वाढवण्यासाठी दररोज थोडेसे खोब-याचे तेल केसांच्या मुळाशी लावावे.

Trending