हातांनादेखील रिलॅक्स करणे / हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

दिव्य मराठी

Jan 28,2013 07:30:00 PM IST

बैठे काम करणार्‍या व्यक्तींनी मध्ये मध्ये हातांना आराम देणारा व्यायाम केला पाहिजे. संगणकावर काम करणार्‍यांच्या हाताचे कोपरे बर्‍याच कालावधीसाठी एकाच स्थितीत राहतात. अशाने हाताचे स्नायू आखडून दुखण्याचा त्रास होतो.

प्रकार 1
- दोन्ही हात समोर करत आरामात बसावे

- दोन्ही हात सावकाशपणे मागे घ्या. हातांवर दाब असल्याप्रमाणे मागे घ्या. या वेळी हाताची बोटे वरच्या दिशेने असावीत.

- आता पंजांना खालच्या दिशेने झुकवा. बोटांची दिशा जमिनीच्या बाजूने असावी.

- हा प्रकार करताना मनगट एकदम सरळ असावे.

प्रकार- 2
- आरामदायी स्थितीत बसा

- आता उजव्या हाताची मूठ बांधा आणि अंगठय़ाला इतर बोटांच्या मदतीने दाबा

- आता बंद मुठीला हळूहळू फिरवा. या वेळी कोपरा आणि हात एका रेषेत सरळ असेल याकडे लक्ष द्या.

X
COMMENT