आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावखु-या लोकांना रोगराईचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही डावखुरे आहात काय? असे असाल तर हे नक्की वाचा. येल विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की,उजव्या हाताने काम करणा-यांच्या तुलनेत डाव्या हाताने काम करणा-या लोक स्किझोफ्रेनिया विकाराचे बळी जास्त ठरू शकतात. हा एक प्रकारचा मनोविकार आहे. जिथे डिप्रेशन आहे, तिथे तो दोन्ही प्रकारांत आढळून येतो. अमेरिकेतील 10 टक्के लोकसंख्या डाव्या हाताने कामे करते, ही बाब उल्लेखनीय आहे. येल चाइल्ड स्टडी सेंटरचे संशोधक जेडोन वेब यांनी स्किझोफ्रेनियाने बाधित 40 टक्के लोक डावखुरे असल्याचे म्हटले आहे. जेडोन हे शिशू आणि किशोरवयीन मुलांवर संशोधन करणारे मनोवैज्ञानिक आहेत.

ते म्हणतात की,जे सायकोसिस असतात ते वास्तवापासून दूर राहतात. त्यांचे अंधविश्वास त्यांच्यावर ताबा मिळवतात. एक प्रकारे बुद्धिभ्रंश झालेल्या स्थितीत हे लोक राहतात. जेडोन वेब व त्यांच्या सहकाºयांनी 107 लोकांवर संशोधन केले. कमी कमाई असलेल्या शहरी लोकांवर हे संशोधन केले गेले. असेही दिसून आले की,डाव्या हाताने कामे करणारे सायकोसिसचे रुग्ण असतात. संशोधन करताना हे लोकांना विचारले गेले की ते कोणत्या हाताने लिहितात? या केवळ एकाच प्रश्नावरून बरेच काही स्पष्ट होते, असे वेब म्हणतात. यानंतर साधारण विश्लेषण केले गेले. ‘सेज’ या नियतकालिकात हा संशोधन निष्कर्ष देण्यात आला आहे. (स्रोत- हफिंग्टन पोस्ट)