आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी हे करा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूतकाळातील चांगले दिवस तुम्ही नेहमी आठवता. काळ बदलेल, पण त्यासोबत विचारही बदलले तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी आणि यशस्वी राहाल.

आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला वास्तव स्वीकारावे लागेल. या स्वीकारामुळे तुम्ही निवडलेल्या दिशेने पुढे मार्गक्रमण करणे सोपे जाईल. शांततेसोबतच नव्या शक्यतांबाबत विचार करा. त्यानंतर यशाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी दृढ निश्चय आणि त्यावर अंमलबजावणी करा.

आपले ध्येय जाणून घ्या आणि त्यानुसार स्वप्न पाहा. आपल्या क्षमतांचा विस्तार करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी दररोज त्या दिशेने हळूहळू पुढे जाणे आवश्यक आहे. अनेक वेळा तुम्ही आराम मिळावा यासाठी नव्या गोष्टी करण्यापासून स्वत:ला रोखता, पण असे करू नका.

प्रत्येक दिवसाचे खुलेपणाने आणि सकारात्मक विचारांनी स्वागत करा. तुम्ही काय करू शकता याला फार महत्त्व नसते, तर तुम्ही काय कराल, ते जास्त महत्त्वाचे आहे. नव्या शक्यतांनी स्वत:ला प्रेरित करा. त्यामुळे कोणतीही समस्या तुमच्यासाठी अडसर राहणार नाही.

‘मी करू शकत नाही’, ही गोष्ट खूप परिणामकारक असते. ही गोष्ट कणखर माणसाला अशक्त, सुखी माणसाला दु:खी, धाडसी माणसाला भित्रा आणि तुमच्या महान विचारांना रसातळाला नेऊ शकते. याउलट ‘मी करू शकतो’ हे तुमचे ध्येयवाक्य बनवा. आयुष्यात कधीही नकारात्मक परिस्थिती उद्भवल्यास अधिक सक्रिय व्हा. सकारात्मक परिणाम मिळतील.

स्वत:वर शंका घेणे आणि स्वत:विषयी नकारात्मक निर्णय घेण्यापेक्षा जास्त दु:खदायी वेळ कोणतीही नसते. असे कधीही करू नका. तुम्ही जगातील सर्वात सुंदर आणि चांगली व्यक्ती आहात, असा विचार करा. त्यामुळे तुमचे चरित्र प्रभावशाली होईल आणि तुम्हाला भेटणारे मित्रही तुमच्यापासून प्रभावित होतील.