आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बटर, अंड्यामध्ये असते कोलेस्ट्रॉल, जाणून घ्या, 'हेल्दी फूड'चा योग्य अर्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकीटबंद खाद्यपदार्थांत कोणकोणते घटक किती मात्रेत आहेत याची माहिती पाकिटावर दिली जाते, परंतु लेबलवर लिहिलेले हे शब्द योग्य अर्थाने समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे आरोग्य आणि आवश्यकतेनुसार पाकीटबंद खाद्यपदार्थ विकत घेण्यात मदत होते.

कोलेस्ट्रॉल फ्री...
याचा अर्थ असा होत नाही की, पाकीटबंद खाद्यपदार्थांत कोलेस्ट्रॉलची मात्रा अजिबात नाही. प्रत्येक सेवनात 2 मिलीग्रॅमपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल आणि 2 ग्रॅमपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्स असतो. लो कोलेस्ट्रॉलचा अर्थ प्रत्येक सेवनात 20 मिलीग्रॅमपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल आणि दोन ग्रॅमपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्स असा होतो. कोलेस्ट्रॉल शरीरात तयार होते. मांस, मासे, डेअरी उत्पादने, अंडे, बटरमध्ये कोलेस्ट्रॉल असते, तर प्लान्ट बेस्ड उत्पादनांमध्ये नसते. दररोज 300 मिलीग्रॅम किंवा कमी कोलेस्ट्रॉलचे सेवन केल्याने नुकसान होत नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शुगर फ्रीपासून ते कॅलरी फ्री/ झिरो कॅलरीज पाकीटबंद खाद्यपदार्थ संदर्भातील विशेष माहिती...