मसाले स्वयंपाकाची चव वाढवतात त्याचबरोबर यामध्ये विविध औषधी गुणही आढळून येतात. भारतामध्ये मसाल्यांचा उपयोग पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. मसाल्यातील औषधी गुणांचा उल्लेख आयुर्वेदामध्येही भरपूर करण्यात आला आहे. भारतीय स्वयंपाकघरात तमालपत्राचा उपयोग मसाला स्वरुपात केला जातो. तमालपत्राची शेती प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते, परंतु हे भारतामध्ये सर्वठिकाणी उपलब्ध होते. तमालपत्राला दक्षिण भारतात तेजपान म्हणतात. नेपाळ आणि हिंदीमध्ये तेजपत्ता, आसाममध्ये तेज पत, इंग्रजीमध्ये बे लीफ, तर संस्कृत आणि मराठीत तमालपत्र असे संबोधले जाते. याचे वानस्पतिक नाव सिनॅमोमम तमाला असे आहे. आज आम्ही तुम्हाला तमालपत्राच्या औषधी गुणांची तसेच आदिवासी लोक कशाप्रकारे याचा उपयोग करून विविध आजारांवर उपचार करतात याची माहिती सांगत आहोत.
तमालपत्र संदर्भातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.
- डोकेदुखी आणि खोकल्यामध्ये लाभदायक
आदिवासी लोकांच्या माहितीनुसार तमालपत्राच्या तेलाने मालिश केल्यास डोकेदुखी, अर्धांगवायू आणि मांसपेशीच्या वेदनेत आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने मालिश केल्यास शांत झोप लागते आणि रक्तसंचार योग्य पद्धतीने होतो.
- मधासोबत तमालपत्राचे चूर्ण घेतल्यास सर्दी आणि खोकल्यात लवकर आराम मिळतो. पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, तोंड आले असेल तर या मिश्रणाचे सेवन करू नये.
तमालपत्राचे इतर फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...