आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणानंतर रोज विलायची खाल्ल्याने होतील हे 7 Health Benefits

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलायची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो. विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. यामध्ये आयरन आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी आणि नियासिन देखील असते. हे रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. विलायची खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण पाहुया विलायची खाल्ल्याने होणा-या काही फायद्यांविषयी...

1. पचनक्रिया सुरळीत करते
जेवणानंतर अनेक लोक विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात. कारण, विलायची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते. विलायची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातितील जळजळ संपवण्याचे काम करते.
आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे विलायची पचनक्रियेत मदत करते. जर तुम्हाला अपचनाची समस्या आहे तर तीन विलायची, अदरकचा छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धने बारीक करा. हे पावडर गरम पाण्यासोबत घ्या. पोटासंबंधीत सर्व समस्या दूर होतील.

विलायची खाण्याचे असेच काही फायदे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...