चिकू गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. उन्हाळ्यात याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यदायी लाभ होतात. या फळामध्ये ७१ टक्के पाणी, १.५ टक्के प्रोटीन. १.५ टक्के वसा आणि २५.५ टक्के कार्बोहायड्रेट तत्व आढळून येतात. यामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असते. चिकूत साखरेचे प्रमाण पुष्कळ असल्याने ती रक्तात मिसळून ताजेतवाने बनवते.
डोळ्यांसाठी लाभदायक - चिकूमध्ये व्हिटॅमिन ए पर्याप्त मात्रेमध्ये आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने डोळे स्वस्थ राहतात आणि डोळ्याच्या समस्या दूर होतात.
शरीराला उर्जा मळते - चिकूत साखरेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे, याचे सेवन केल्यास शरीराला त्वरित उर्जा मिळते. यामुळे उन्हाळ्यात दररोज चिकू खाणे फायदेशीर ठरते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या चिकूचे आणखी खास फायदे...