आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात चिकू खाण्याचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही व्हाल चकित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकू गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. उन्हाळ्यात याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यदायी लाभ होतात. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकराचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. चिकूची साल ताप नाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो.

- चिकुमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. चिकुमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असते. जे लोक जास्त काम करतात त्यांना उर्जेची जास्त आवश्यता असते. अशा लोकांनी चिकूचे नियमित सेवन करावे.

- चिकुमधिल पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात चिकूचे सेवन केल्यास आराम मिळू शकतो.

चिकूचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...