Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | health information

PHOTOS : गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत

दिव्य मराठी | Update - Jan 25, 2013, 11:46 AM IST

तज्ज्ञांच्या मते कोणत्याही आजाराने पीडित होण्यापूर्वी शरीर त्याचे संकेत द्यायला लागते.

 • health information

  तज्ज्ञांच्या मते कोणत्याही आजाराने पीडित होण्यापूर्वी शरीर त्याचे संकेत द्यायला लागते. या संकेतांकडे मात्र गांभीर्याने पाहावे. ही लक्षणे जर वेळीच ओळखली तर समस्येचे निदान केले जाऊ शकते.

 • health information

  श्वास घेण्यास त्रास - हा हृदयाशी संबंधित सर्वात सामान्य संकेत आहे. याला वैद्यकीय भाषेत डिस्पेनिया म्हणतात. यामध्ये पीडिताला श्वास घेण्यास त्रास होतो. ही कार्डिएक किंवा पल्मोनरी (फुप्फुसाशी संबंधित आजार) डिसीजची देखील लक्षणे असू शकतात. अशावेळी चालताना, धावताना किंवा पायर्‍या चढताना, काम करताना किंवा काही पावले चालतानाही श्वास घेण्यास त्रास होतो.

 • health information

  छातीत दुखणे - याला वैद्यकीय भाषेत एंझायमा म्हणतात. जर पीडिताला अस्वस्थ, छातीत दाबल्यासारखे किंवा शरीर सुन्न होण्यासारखी लक्षणे दिसून आल्यास ती हृदयाच्या त्रासाशी संबंधित आहेत. याकडे गांभीर्याने पाहावे.

 • health information

  डोकेदुखी, दम लागणे - अचानक डोके दुखणे, चेतनेत कमतरता येणे, घामाने भिजणे आणि घाबरल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे हृदयरोगांशी संबंधित असू शकतात. थोडेसे काम केल्यास लवकर थकवा येणे किंवा दम लागणे हे किडनी आणि लिव्हरची कार्यप्रणाली बाधित होण्याचे संकेत आहेत. असे गॅस्ट्रोइंटेस्टिनल किंवा मधुमेह झाल्यावरही होऊ शकते. त्यामुळे याकडेही गांभीर्याने पाहावे.

 • health information

  हृदयाचा वेग - हृदयाचे ठोके अनियमित होणे देखील हृदयरोगाचा संकेत आहे. साधारणत: लोक आपल्या हृदयाच्या सामान्य वेगापासून अनभिज्ञ असतात. हृदयाचे ठोके वेगाने किंवा मंदगतीने होत असल्यास त्याकडे कानाडोळा करू नये. अशावेळी पीडिताला मान किंवा छातीत चावल्यासारखे आणि दाब पडत असल्यासारखे जाणवते.

Trending