आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिरतरूण राहण्यासाठी करा हे आयुर्वेदिक उपाय, राहा आजारांपासून दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजैन - आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक तरूण अकाली म्हातारपणात होणार्‍या आजारांच्या गराड्यात सापडतात. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा वाढणे, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष हे सर्व म्हातारपणाचे आजार आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगितले आहेत. या उपचारांचा वापर करून तुम्ही दिर्घकाळ या आजारांपासून दूर राहू शकता.
पाहा काही असे उपचार, ज्यांच्यामुळे तुम्ही दिर्घकाळ तरूण राहाल.
रोज वापरा हे उपचार
दररोज आवळ्याचे रस, गायीचे तुप, मध व मिश्री प्रत्येकी 15-15 ग्रॅम घेऊन मिश्रण बनवावे. सकाळी भुकेल्या पोटी याचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहाल. हा उपाय तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी एकदम मस्त उपाय आहे.
- दररोज डाळींबाचे सेवन करण्यानेही म्हतारपणातील आजार दूर होतात आणि तारूण्यावस्था दिर्घकाळ राहते. डाळींबाचे सेवन रक्तासंबंधीच्या अनेक आजारांपासून शरीराला वाचवते. तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो.

लक्षात ठेवा, या उपचारांना सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पुढे पहा... काही खास गोष्टी ज्या नेहमी लक्षात ठेवायला हव्यात...
सर्व छायाचित्रे केवळ सादरीकरणासाठी घेण्यात आली आहेत