आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Healthy Advice For Women In Their 20s, 30s & 40s

FOR WOMEN: गुड हेल्थ आणि उत्तम लाइफसाठी फिटनेस टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20-29, 30-39 आणि 40-49 वयातील महिलांसाठी HEALTH ADVICE

आज महिला घर आणि ऑफिस असे दोन्ही गोष्टी सांभाळतांना आपल्याला दिसतात. अशा या म्हत्त्वाच्या जवाबदा-या सांभाळणा-या महिलांचे ब-याच वेळेस स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या वयात महिलांच्या शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते.हाडांचे आजार, पोटाच्या तक्रारी असे एक न अनेक समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते. या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनावरही पडत असतो. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी सांभाळणा-या महिलांचे आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी आम्ही महिलांच्या वयानुसार महत्त्वाच्या हेल्थ टिप्स सांगत आहोत.
20-29 वयातील महिलांसाठी HEALTH ADVICE -

कॅल्शिअमचे प्रमाण वाढवा -
लहानपणी आपण सगळेच दुध प्यायचो. पण जसे-जसे वय वाढले आपल्याला दुधाला वास येत असल्याचे वाटायला लागले आणि आपण दुध पिणे बंद करून टाकले. पण दुध पिल्याने शरिरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच शरीरात ताकद येण्यास मदत होते. दुधाने कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवत नाही. तुमचे शरीर ठणठणीत राहणासाठी तुम्ही रोज दुध घेतल्यास ऑस्टियोपोरोसिस (या आजारांमध्ये हाडे कमजोर होतात) सारख्या आजार होण्यापासून वाचता येते. तुम्हाला जर दुध आवडत नसेल तर तुम्ही दही अथवा पनीरचे पदार्थ खावून कॅल्शिअमचे प्रमाण वाढवू शकतात. बाजारात कॅल्शिअम वाढवण्याचे औषधे मिळतात परंतू दुधाचे पदार्थ घेणे केव्हाही उत्तम.

सनस्क्रीन जरूर वापरा -
सुर्याच्या प्रखर किरणांमुळे स्किन कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी बाहेर जातांना सनस्क्रीन लावावे. सकाळी 10 ते 4 यावेळात जर तुम्ही बाहेर पडत असाल तर नक्की क्रिम लावून बाहेर पडावे.

तुमच्या वयानुसार हेल्थ टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...