आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी फळ आवळा, जाणून घ्‍या अमुल्‍य फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आवळा अम्लपित्तावरील श्रेष्ठ औषध आहे
-आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
-ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. याने पोट नियमीतपणे साफ होऊ लागते.
-आवळ्यामध्ये vit c प्रचूर प्रमाणात असते. त्यामुळे हिरड्यातून, नाकातून रक्त येणे अशा आजारांमध्ये आवळा हे उत्तम औषधआहे.
-नियमीत आवळा खाल्याने त्वचेची कांती सुधारते. तसेच त्वचेशी संबंधीत आजार उदभवत नाही.
-आवळ्याच्या नियमीत सेवनाने बुद्धी, स्मृर्ती तसेच ज्ञानेंदियांची कार्यशक्ती वाढते.
-आवळ्याचा रस हळदीसोबत घेतले असता मधूमेह नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो.
-अनियमीत आवळ्याच्या सेवनाने शारीरिक व मानसिक थकवा दूर होऊन उत्साह व स्फूर्ती वाढते.
-केस काळे ठेवणे तसेच केसातील कोंडा दू करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.
-डोळ्यांशी संबंधीत आजारांमध्ये तसेच दृष्टी सुधारण्यासाठी आवळा खाणे फायदेशी आहे.
-हात पायाच्या तळव्याची आग तसेच सर्वांगाची आग होत असल्यास आवळ्याचा रस मधासह घ्यावा.
-तरुणावस्थेपासूनच नियमीतपणे आवळ्याचे सेवन केल्यास वार्द्धक्याशी संबंधीत लक्षणे लांबवण्यास फायदा मिळतो. म्हणजे हवीहवीशी वाटणारी तरुणावस्था दीर्घकाळ टिकून
-गर्भवती स्त्रीयांनी आवळा खाल्याने बाळाचे तसेच गर्भवती स्त्रीच्या शरीराचे उत्तम पोषण होते. तसेच गर्भवतीला सामान्यता होणारा मलावरोधाचा त्रास कमी होण्यास देखील फायदा होतो.
-आवळा सेंधेमीठासह खाल्यास षडरसयुक्त आहाराचे फायदे मिळतात.
- मोरावळा, च्यवनप्राश या स्रुपात देखील आवळ्याचे सेवन केले जाऊ शकते.