आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Face Pack, Skin Problem, Glowing Skin, Natural Face Pack

घरातच तयार करू शकता हे फेसपॅक, उजळून निघेल चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या धावपळीच्या जगात त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्वचा डल आणि काळी दिसू लागते. यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडते. अशा वेळी बाजारातील उत्पादनांचा वापर न करता नैसर्गिक उपाय करावेत. वेळेच्या कमतरतेमुळे लोकांचे पारंपारिक आयुर्वेदिक उपायांकडे दुर्लक्ष होत आहे. हळूहळू रासायनिक वस्तू यांची जागा घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला काही निवडक आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहोत. हे उपाय केल्यास तुमचा चेहरा कॉस्मेटिक्सचा वापर न करता तजेलदार आणि उजळ दिसेल. येथे जाणून घ्या, काही घरघुती फेसपॅकचे खास उपाय....

हळद, दह्याचा फेसपॅक -
हा लेप तयार करण्यासाठी एक चमचा हळदीमध्ये एक चमचा दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर 15 मिनिट लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. या फेसपॅकने त्वचेवरील काळेपणा दूर होईल आणि त्वचा उजळ दिसेल.

हळद, चंदनाचा फेसपॅक -
थोड्याश्या हळद, चंदनामध्ये दुधाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर लावून २-३ मिनिट हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर 10 मिनिट पेस्ट चेहर्‍यावर तशीच ठेवा. थोड्यावेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. चेहरा उजळलेला दिसेल.

पुढे वाचा, आणखी काही खास घरगुती उपाय...