आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Home Remedies And Benefits Of Sesame

मकर संक्रांती : तिळाचे हे 11 उपाय शरीराला प्रदान करतील नवीन उर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय आहारात तिळाचे खूप महत्त्व आहे. मकर संक्रांती, थंडीच्या काळात तीळ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि शरीर सक्रिय राहते. तिळामध्ये विविध प्रकारचे प्रोटीन, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट तत्त्व आढळून येतात. तिळाचे सेवन केल्याने तणाव दूर होतो तसेच मानसिक दुर्बलता येत नाही. या व्यतिरिक्त प्राचीन काळापासून सौंदर्य कायम ठेवण्यासाठी तिळाचा उपयोग होत आला आहे. तीळ तीन प्रकारचे असतात काळे, पांढरे आणि लाल. लाल तिळाचा उपयोग फार कमी प्रमाणात केला जातो. तिळाचे तेलही शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे काही खास फायदे आणि घरगुती उपाय सांगत आहोत.