आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे घरगुती उपाय चुटकीसरशी दूर करतील पोटदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटदुखी, गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी या कॉमन समस्या आहेत. या समस्येंचे मुख्य कारण अन्न व्यवस्थित न पचणे हे आहे. पोट अनेक आजारांचे मूळ आहे. पोट खराब असेल तर शरीर विविध आजारांचे घर बनते. अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.

उपाय
1. एक चमचा अद्रकाच्या रसामध्ये मध थोडासा मध टाकून घेतल्यास पोटदुखी दूर होते.

2. थंड पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास पोटदुखीमध्ये आराम मिळेल.

3. अर्धा चमचा अद्रकाचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रास घेऊन त्यामध्ये शेंडी मीठ टाका. दररोज जेवणापूर्वी या मिश्रणाचे सेवन करा. या उपायाने भूक लागते आणि पोटदुखी दूर होते.

4. विना दुधाचा चहा प्यायल्यास पोटदुखीमध्ये आराम मिळेल.

5. पोटदुखीमध्ये डाळिंब खाल्ल्यानेही आराम मिळू शकतो. डाळींबाच्या दाण्यांवर मीठ आणि काळी मिरीची पावडर टाकून दिवसातून दोन वेळेस याचे सेवन करावे.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...