आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाच्या या समस्यांवर रामबाण आहेत हे आदिवासी उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटामध्ये सूक्ष्मजीव संक्रमण झाल्याने किंवा संक्रमित खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने अपचन, गॅस, अतिसार, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा संक्रमणापासून दूर राहण्यासाठी आदिवासी लोक कारले, कडूनिंब, हळद, मेथी या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करतात. जे लोक या गोष्टींचे सेवन करतात त्यांच्यावर संक्रमणाचा प्रभाव पडत नाही. संक्रमित रोगांपासून दूर राहण्यासाठी आहार परिवर्तनाशिवाय काही आयुर्वेदिक उपायही केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, अशाच काही खास आयुर्वेदिक उपायांची माहिती...

1. अशुद्ध किंवा संक्रमित पाणी प्यायल्याने पोटाच्या विविध समस्या निर्माण होतात. आदिवासींच्या मतानुसार काळे मीठ, ओवा, काळे मिरे, अद्रक, लसुण समान प्रमाणात घेऊन बारीक कुटून घ्या. यामध्ये चवीनुसार हिंग टाका. मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. जवळपास 2 तासाच्या अंतराने या मिश्रणाचे अर्धा चमचा सेवन करा. अपचन, गॅस, कोरडा ढेकर, एसिडिटी या समस्या दूर होतील.

2. आधुनिक विज्ञानानुसार लसुण, अद्रक, काळे मिरे, ओवा यामध्ये सूक्ष्मजीव संक्रमण नष्ट करण्याची क्षमता असते. संक्रमित पाणी किंवा खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने होणार्‍या आजारांवर हे रामबाण उपाय आहेत.

सर्दी-खोकला आणि संक्रमित रोगांशी संबंधित रोचक माहिती आपल्याला डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून भारतातील दूरवर पसरलेल्या आदिवासी गावांतील उदा. पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरवली (राजस्थान) आदीवासींच्या पारंपरिक ज्ञानाला एकत्र करून त्याला आधुनिक विज्ञानच्या साह्याने प्रमाणित करण्याचे कार्य करत आहेत.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...