आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपाय छोटा फायदा मोठा: स्‍मरणशक्ती वाढविण्‍यासाठी करा हे छोटे उपाय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता? एखादी महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात असे झाले आहे का? काही लोकांना विसरण्याचा आजार असतो. एखादी गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरलो याचा ते विचार करत बसतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही छोटे घरगुती उपाय .काही ब्रेन फूडस्. खाल्ल्याने अल्झायमर्ससारखा रोग होत नाही. तसेच मेंदूची शक्‍तीसुध्‍दा वाढते.
टोमॅटो- आंबट-गोड टोमॅटो जेवणाची चव वाढवतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, विटामिन, स्निग्ध पदार्थांचे गुण असतात.यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. टोमॅटोमध्ये लायकोपिन असते. हे शरीराचे फ्री रॅडीकल्सपासून रक्षण करते. हे मेंदूतल्या पेशींचे नुकसान होण्यापासूनदेखील वाचवते.
अक्रोड- रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची वाढ होते. सोबतच तब्येतीच्या अनेक समस्या दूर होतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3, फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर समाविष्ट असतात. रोज थोडे अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.