अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरु होते आणि याच गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार (ज्यांना आयुर्वेदामध्ये वात रोग असे म्हणतात) निर्माण होतात.
ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना एसिड रिफ्लक्सचा त्रास सुरु होतो. तुम्हालाही वारंवार गॅस, अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.
गॅसची समस्या निर्माण होण्याचे खास लक्षणं -
1. मळमळ
2. उलटी
3. वारंवार उचकी
4. पोटदुःखी आणि सूज
पाणी प्यावे -
पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे या आजाराचे मोठे कारण आहे. गॅस, अॅसिडिटीचा त्रास असो किंवा नसो दिवसातून कमीतकमी ८ ग्लास पाणी अवश्य प्यावे. केव्हाही गॅस, अॅसिडिटीचा त्रास सुरु झाल्यास जास्त प्रमाणात पाणी प्यावे.
(येथे फोटोंचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)