आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयात केस गळत असतील तर करा हे सोपे घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस हा सार्‍यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. केसांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारची ओळख मिळत असते. विशेषतः महिला वर्गाला ही ओळख जास्त महत्त्वाची असते. केस कुणाच्याही सौंदर्यात कशी भर घालतात हे कांही सांगायला नको. मात्र या केसांची निगा आणि कांही तक्रारी असल्यास त्या दूर करणे हे मोठे कामच होऊन बसते. अशा वेळी हे छोटे छोटे उपाय नक्कीच फायद्याचे ठरतात. चटकन करता येणारे हे उपाय तुम्‍ही केले तर केस गळती थांबेल व तुमच्‍या सौंदर्यात भर पडेल.

लहान वयातच किंवा तरून असताना केस गळत असतील किंवा केस गळती आनुवांशिक असेल तर याला एंड्रोजेनिक एलोपेसिया म्‍हटले जाते. या प्रकारात किशोर वयातच केस गळायला लागतात.आनुवांशिक असेल तर महिलांना तीस वर्षानंतर केस गळतीच्‍या समस्‍येचा सामना करावा लागतो. याशिवाय चुकीचा आहार, पर्यावरण प्रदुषण, औषधाची साईड इफेक्‍ट यामुळे अकाली केस गळण्‍याची समस्‍या निमार्ण होऊ शकते. या समस्‍येपासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठी आज आम्‍ही आपल्‍याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

- जटामांसी या वनस्‍पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळा. थंड झाल्‍यानंतर तेल बॉटलमध्‍ये भरून ठेवा. रोज रात्री हे तेल डोक्‍याला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- आहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेल टाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...