आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास भाज्या : आदिवासी स्वस्थ शरीर आणि ताकदीसाठी करतात यांचा उपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनियमित खानपान आणि दिनचर्या, जास्त प्रमाणात फास्ट फूडचे सेवन इत्यादी कारणांमुळे विकसित समाजातील आपल्यासारख्या लोकांचे आयुष्यमान 60 ते 65 वर्षांचे झाले आहे तर आदिवासी लोकांचे आयुष्यमान 80 ते 85 वर्षांचे आहे. तर मग, विकसित आणि स्वस्थ कोण? आपण का ते लोक, जे आजही आदिवासी म्हणून ओळखले जातात. जास्त विकसित आणि पैसा कमावण्याच्या शर्यतीमध्ये आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांपासून दूर घेऊन जात आहोत. आहाराच्या नावावर कृत्रिम रंगाने रंगवलेल्या भाज्या आणि फास्ट फूड कल्चर आपल्या आरोग्याला नष्ट करत आहे. जर तुम्ही आदिवासी लोकांसारखे स्वस्थ राहण्यास इच्छुक असाल तर येथे जाणून घ्या, काही अशा भाज्यांबद्दल ज्या तुम्हाला नेहमी स्वस्थ आणि निरोगी ठेवतील.

तोंडले - ही भारतात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांची भाजी करतात. फळे सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्या नंतर ती लाल दिसतात. तोंडल्यामध्ये कॅरोटीन व्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमसारखे महत्त्वपूर्ण तत्व आढळून येतात. गुजरात येथील डॉँग आदिवासी भागात तोंडल्याची भाजी खूप प्रचलित आहे. येथील आदिवासी लोकांच्या मतानुसार अर्धेकच्चे तोंडले काही दिवस खाल्ल्यास डोळ्यांना लागलेला चष्मा काढून ठेवाल. तोंडले काविळीवर, कुष्ठरोगावर व पांडुरोगावर गुणकारी आहेत.