आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती सर्वात पुढे राहण्याच्या प्रयत्नात शरीराकडे दुर्लक्ष करत आहे. अनेकवेळा घाईगडबडीत आपल्याला एखादी दुःखापत, जखम होते. त्यानंतर आपण तत्काळ आराम मिळावा यासाठी पेनकिलर घेतो परंतु यामुळे आराम मिळतोच असे नाही. जर तुम्हालाही अशीच एखादी, दुःखापत, जखम, अंगदुखी झाल्यामुळे वेदना होत असतील किंवा सूज आली असेल तर निर्गुंडीचा उपयोग करावा.
आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे की....
सिन्दुक: स्मृति दस्तिक कषाय: कटुकोलघु।
केश्योनेत्र हितोहन्ति शूल शोथाम मारुतान्।
कृमि कुष्टारुचि श्लेष्व्रणन्नीला हितद्विधा।।
सिंदुरवारदलं जन्तुवात श्लेष्म हरं लघु।
निर्गुंडी ही उत्तम वेदनाशामक आहे. इतर वेदनाशामक औषधांचे, गोळ्यांचे जसे दुष्परिणाम असतात तसे या वनस्पतीचे नाहीत. कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी निर्गुंडीचा पाला प्रभावी ठरतो.
उपाय - निर्गुंडीची पानं पाण्यात उकळून घ्या. गरम पाण्यात सुती कपडा भिजवून सुजलेल्या किंवा वेदनेच्या ठिकाणी शेका. या उपायाने अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे यामध्ये आराम मिळेल. कफ, खोकला, फुफुसावरील सूज कमी करण्यासाठी निर्गुंडीच्या पानांवर तूप लावून पानं गरम करून पाठीवर, छातीवर बांधा.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, वेदनेपासून मुक्ती मिळवण्याचे खास घरगुती उपाय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.