आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात अवश्य करा, या 9 घरगुती पेयांचे सेवन, मिळेल शरीराला थंडावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात पोटाचे तसेच विविध आजार कोणालाही आपल्या विळख्यात घेऊ शकतात. उष्णता दिवसेंदिवस वाढत असून लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवत आहे आणि यामागचे कारण शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, खूप घाम, थकवा येणे इ. समस्या उन्हाळ्यात होणे सामान्य गोष्ट आहे. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती ठाण पेयांबद्दल सांगत आहोत.

ताक - जेवणानंतर ताकाचे सेवन शरीरासाठी उन्हाळ्यात लाभदायक आहे. हे उन्हाळ्यातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी पेय आहे. ताक पिल्याने पोटाला थंडावा मिळतो. अपचनाची समस्या दूर होते.