आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 पद्धतीने 7 दिवसात कमी होऊ शकतो फॅट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटाची चरबी वाढणे अनेक आजारांना आमंत्रण ठरू शकते. यामुळे केवळ तुमची फिगर खराब होत नाही तर तुमच्या आरोग्यही बिघडू शकते. अनियमित दिनचर्या आणि आहारामुळे ही समस्या निर्माण होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत राहतात. तुम्हालाही या समस्येतून मार्ग काढण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेले योगासन सात दिवस नियमित करून पाहा. निश्चितच तुमच्यामध्ये झालेले फरक तुम्हाला जाणवेल.

पश्चिमोत्तासन
या आसनामध्ये पाठीचे स्नायू ताणतात, त्यामुळे त्याला पश्चिमोत्तासन म्हणतात. हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते आणि वजनही कमी होते.

कृती -
- पायांना समोर फैलावून बसा. पायाच्या पंजांना बाहेरच्या दिशेला ताणून बसा.
- तळ हातांना गुडघ्यांवर ठेवून श्वास रोखून हातांना वरच्या दिशेला उचला आणि कंबरेला सरळ करून वरच्या दिशेला ताण द्या.
- आता श्वास सोडत पुढे वाका आणि हातांनी पायांच्या अंगठ्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा. तसेच
डोक्याला आपल्या गुडघ्यांवर टेकवा. एक लक्षात ठेवा की, गुडघे वाकायला नको.
- आता कोपरांना जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. डोळे बंद करून श्वास साधारण ठेवा.
- नंतर श्वास घेऊन जैसे थे स्थितीत या. ही क्रिया १० ते १५ वेळा करा.

पुढे जाणून घ्या, इतर दोन योगासनांची माहिती....
बातम्या आणखी आहेत...