आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज हे खाल्ल्यास औषधांची गरज नाही, दूर होतील गंभीर आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळशीला भारतात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्येही ही तुळस अत्यंत गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे. विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यांच्यासाठीही लाभदायक ठरते.

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुंच्या घरा घरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पुजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुगंधही अत्यंत सुंदर असतो. तसेच काही खाद्यपदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. अनेक आजारांवर चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा घेतला जातो. जे लोक नियमितपणे तुळशीच्या चार-पाच पानांचे सेवन करतात त्यांना वातवरण बदलामुळे होणारे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत नाहीत.

तुळशीमध्ये प्रभावकारी रोगनाशक शक्ती आहे. विशेषतः सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये तुळस प्रभावकारी औषध आहे. यामुळे भारतीय आयुर्वेदातील सर्वात प्राचीन ग्रंथ चरक संहितेमध्ये सांगण्यात आले आहे की...

हिक्काज विषश्वास पाश्र्वमूल विनाशिन:।
पितकृतत्कफवातघ्नसुरसा: पूर्ति: गन्धहा।।

सुरसा म्हणजे तुळस गुचकी, खोकला, विषाचा प्रभाव कमी करणारी औषधी वनस्पती आहे. यामुळे पित्ताची वृद्धी आणि दुषित वायू नष्ट होण्यास मदत होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुळशीचे घरगुती उपाय आणि विशेष माहिती...