आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडासा ओवा अशा पद्धतीने खाल्ल्यास या आजारांमध्ये औषधांची गरज भासणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओवा शास्त्रीय नाव Trachyspermum copticum , ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम. ही पश्चिम आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो.

ओव्याम्ध्ये 7 टक्के कार्बोहाइड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, पोटॅशिअम, सोडिअम, थायमिन, रिबोफ्लेविन, निकोटिनिक एसिड अल्प मात्रामध्ये, अंशिक स्वरुपात आयोडीन, शर्करा, सेपोनीन, टेनीन आणि 14 टक्के तेल आढळून येते. यापासून मिळणारे सुगंधित तेल 2 ते 4 टक्के असते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, ओव्याचे घरगुती उपाय...