आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदार्थांची केवळ शोभा वाढवण्यासाठीच नाही तर या रोगांवरही उपयुक्त आहे कोथिंबीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोथिंबिरीच्या रोपाला आलेले सुवासिक फळ धने, हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे. मसाला स्वरुपात आणि पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. कोथिबिरची हिरवी पानं किंवा याचे वाळलेले बी, यांचा वापर घराघरात केला जातो. आधुनिक विज्ञानाने धने आणि कोथिंबिरीचे विविध औषधी गुण प्रमाणित केले आहेत. आज आम्ही तुम्हाला याच्यांशी संबंधित पारंपारिक ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहोत.

1- कोथिंबीरीची पाने खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. यामध्ये अँटीफंगल, अँटीसेप्टिक, डिटॉक्सीफाइंग गुण आढळून येतात. शरीराला वारंवार खाज सुटण्याची समस्या असेल तर कोथिंबीर रामबाण उपाय आहे. कोथिंबीरीची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास खाजेची समस्या दूर होईल.

2- बडीशेप, थोडीशी खडीसाखर, धने पावडर एकसमान प्रमाणात घेऊन याचे चूर्ण तयार करून 6-6 ग्रॅम दररोज जेवण केल्यानंतर खाल्ल्यास हात-पायांची डोळ्यांची जळजळ, अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी दूर होते.

3- हिरवी ताजी कोथिंबीर पाचनातंत्र व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. कोथिंबीरीची हिरवी पाने पित्तनाशक असतात. पित्त किंवा कफाचा त्रास असेल तर कोथिंबीरीचा दोन चमचे रस सेवन केल्यास आराम मिळेल.

या संदर्भातील रोचक माहिती डॉ. दीपक आचार्य ( डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) यांनी दिली आहे. डॉ. आचार्य मागील 17 वर्षांपासून भारतातील दुर्गम आदिवासी पाताळकोट(मध्य प्रदेश), डाँग (गुजरात) आणि आरवली (राजस्थान) भागातील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करून, या ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे कार्य करत आहेत.

पुढे जाणून घ्या, धने, कोथिंबिरीचे खास USE..