आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिरे, दालचिनी आणि हळद, या रोगांमध्ये करतात अचूक औषधीचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्वयंपाकघरातील प्रत्येक मसाला विविध औषधी गुणांनी भरलेला आहे. मसाल्यामुळे अन्नाची चव तर वाढतेच, त्याचबरोबर आपली तब्येत सुधारण्यात सहाय्यक ठरतात. भारतामध्ये परंपरागत औषधी ज्ञानाचा वापर करून अनेक घरांमध्ये या मसाल्यांचा रोगांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. आदिवासी भागांमध्ये तर यांचा उपयोग अनेक घातक रोगांवर केला जातो. आज आम्ही तुम्हाला काही निवडक मसाल्याचे घरगुती उपाय आणि आरोग्यदायी फायदे सांगत आहोत.

1. भारतीय किचनमध्ये जिर्‍याचा वापर जवळपास प्रत्येक व्यंजनात केला जातो. अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर जिरे रामबाण औषध आहे. अ‍ॅसिडिटी झाली तर कच्च्या जिर्‍याची वाफ 1/4 चमचा मात्रेत घ्या. दिवसभरात पाच-सहा वेळा अशा पद्धतीने वाफ घेतल्याने अ‍ॅसिडिटी दूर होईल.

2. डांग गुजरातचे आदिवासी थायरॉइडच्या समस्येत पालक आणि जिर्‍याचा उपयोग करतात. एका ग्लास पालकच्या रसासोबत एक चमचा मध आणि एक चतुर्थांश चमचा जिरे याचे चुर्ण घ्या. याचे सेवन केल्यास थायरॉइडच्या समस्येवर लाभ होतो.

भारतीय मसाले आणि आहारपद्धतीतील ही रंजक आणि पारंपरिक माहिती सांगत आहेत डॉ. दीपक आचार्य. ते अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबादचे संचालक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील आदिवासी भागात काम केले आहे. आदिवासींकडे असलेली पारंपरिक माहिती गोळा करण्याचे काम ते करीत आहेत.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जिरे, दालचीनी आणि हळद यांचे आयुर्वेदीय महत्त्व...
बातम्या आणखी आहेत...