धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते, कारण हे फळ वाळलेल्या स्वरुपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते. थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.
- बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर( १२५ मिलीग्रॅम) आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून घ्या. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.
हिवाळ्यात खारीक खाण्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...