आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्रक वाळवून खाल्यास होतील जबरदस्त फायदे, दूर पळतील हे आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकघरात सतत वापरले जाणारे अद्रक किंवा आले ही बहुगुणी औषधी आहे. पदार्थांना चव आणण्याबरोबरच उपचारासाठी अनेक औषधी तयार करण्यासाठी अद्रक उपयोगी पडते. भारतात सर्वत्र त्याची लागवड केली जाते. जमिनीखाली येत असल्याने त्याचे कंद तयार होतात. अद्रक वाळवून,उकळून त्याची सुंठ तयार केली जाते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, अग्निदीपक, मलसारक आहे.