आयुर्वेदाचे ज्ञान भारतामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित आहे. ऋषीमुनींद्वारे आयुर्वेदामधील वर्णीत चीकीत्सेचे सिद्धांत जेवढे शाश्वत आहेत, तेवढेच शास्त्रोक्त आहेत औषधींचे गुण. फरक फक्त एवढाच आहे की, ज्या गोष्टी आजचे वैज्ञानिक शोधाद्वारे प्रमाणित करत आहेत, कदाचित त्या गोष्टी शतकांपूर्वीच
आपल्या वेदाचार्यांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत.
आपल्यामधील क्वचितच असे काही लोक असतील ज्यांना अद्रकामधील औषधी गुणांची माहिती नसेल. कोरडा खोकला असो किंवा भूक न लागण्याची समस्या, सर्दी, ताप इ. आजारांवर अद्रक प्रभीव औषध आहे. आज आम्ही तुम्हाला अद्रकाचे काही खास फायदे आणि घरगुती उपायांची माहिती देत आहोत.
1. अद्रक आणि लसुन समान प्रमाणात बारीक कुटून एक चमचा पाण्यासोबत सेवन केल्यास अपचनाची समस्या दूर होते.
2. बारीक केलेली सुंठ, थोडेसे हिंग, काळेमीठ एकत्र करून घेतल्यास पोटदुखीमध्ये आराम मिळतो.
3. एक चमचा बारीक केलेली सुंठ आणि कालेमीठ एक ग्लास कोमट पाण्यातून घ्यावे. या उपायाने पोटदुखी, बद्धकोष्ठता, अपचन समस्या दूर होते.
4. जास्त उचकी लागत असल्यास अद्रकाचा थोडासा तुकडा तोंडात ठेवल्यास आराम मिळेल.
पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय आणि फायदे...