आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फणसामधील हे औषधी गुण जाणून घेतल्यानंतर, तुम्हालाही होईल खाण्याचा मोह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा बाजारात कच्चे आणि पिकलेले फणस विकताना दिसतात, परंतु इतर भाज्या आणि फळांच्या तुलनेत फणस विकत घेणारे लोक कमीच असतात. सामान्यतः लोक फणस खाण्याकडे दुर्लक्ष करतात परंतु यामध्ये विविध औषधी गुण आढळून येतात हे फार कमी लोकांना माहिती असावे. ग्रामीण भागात भाजी स्वरुपात खाल्ले जाणारे फणस औषधी गुणांचे भांडार आहे. फणसाचे वनस्पतिक नाव आर्टोकार्पस हेटेरोफायलस आहे. फणसामध्ये महत्त्वपूर्ण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त विविध व्हिटॅमिन्स आढळून येतात.

अल्सर उपचारासाठी लाभदायक
- पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, पिकलेल्या फणसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास अतिसार होण्याची शक्यता राहते. या कारणामुळे आदिवासी लोक हे पिकलेले फळ बद्धकोष्टता आणि पोटातील गॅसमुळे त्रस्त रुग्णांना खाण्याचा सल्ला देतात.

- फणसाच्या झाडाच्या पानांचे चूर्ण अल्सरमध्ये खूप उपयोगी ठरते. या झाडाची कोवळी पान स्वछ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्या. वाळलेल्या पानांचे चूर्ण तयार करून घ्या. पोटातील अल्सरमध्ये हे चूर्ण रामबाण औषधीचे काम करते.

फणसाशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

फणसाचे खास फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...