आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडी खाल्ल्याने कंट्रोल होऊ शकतो डायबिटीज, वाढू शकते यौनशक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः लोक भेंडीकडे फक्त भाजीच्या स्वरुपात बघतात, मात्र आदिवासी भागात भेंडीचा उपयोग अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला भेंडी खाण्याचे काही खास फायदे सांगत आहोत. ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए,बी,सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुध्दा आढळते.
- मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी भेंडीची अर्धी शिजलेली भाजी खाणे आवश्यक आहे. डांग-गुजरात च्या हर्बल तज्ज्ञांच्या मते ताजी हिरवी भेंडी डायबेटीज रुग्णांसाठी खुपच फायदेशीर आहे.

- भेंडीच्या बीयांचे चूर्ण (5 ग्रॅम), विलायची (5 ग्रॅम), दालचीनीच्या सालीचे चूर्ण (3 ग्रॅम) आणि काळी मिर्ची(5 दाणे) या सर्वांना एकत्र बारीक करून घ्या. या मिश्रणाला रोज दिवसातून 3 वेळा कोमट पाण्यात टाकून प्यावे. याचा मधूमेहाच्या रुग्णांना चांगला फायदा होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, भेंडीचे उपाय आणि खास फायदे...