आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : आंब्याचे हे उपाय वाचल्यानंतर तुम्हालाही याचे महत्त्व जाणवेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंब्याला फळांचा राजा मानले जाते आणि उन्हाळ्यात हे फळ अवश्य खावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात. कच्चा आंबा (कैऱ्या) लोणच, मुरंबे व पन्ह करण्यासाठी उपयोगात आणला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस उन्हाळ्यात खाण्यासाठी प्रत्येक घरात अवश्य केला जातो.

आंब्याच्या रसात साखर आणि अ व क जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात. कोयीमधील डाळिंब्या (दळे) आदिवासी लोक भाजून किंवा वाळवून पीठ करून खातात. अन्न म्हणून भाताइतक्या त्या उपयुक्त असतात.
आंब्यातील औषधी गुणांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतामधील दुर्गम आदिवासी भागांमध्ये फिरून तेथील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करत आहेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या आंब्याचे खास उपाय आणि फायदे...