आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबाचे फुल आहे देशी औषध, अशाप्रकारे खाल्ल्यास या आजारांमध्ये मिळेल आराम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाबाच्या फुलांना कोमलता आणि सुंदरतेचे प्रतिक मानले जाते. हे फक्त एक सुंदर फुल नसून विविध औषधी गुणांनी भरलेले आहे. गुलाबाच्या फुलामध्ये विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबाचे काही खास उपाय सांगत आहोत.

- झोप येत नसेल किंवा तणावग्रस्त असाल तर रात्री डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपा. अनिद्रेची समस्या दूर होईल.

- गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि पायरिया रोगातून मुक्ती मिळते.

- गुलाबामध्ये व्हिटॅमिन 'सी' अधिक प्रमाणात असते. गुलकंद दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. दररोज एक गुलाब खाल्ल्यास टी.बी रुग्णाला लवकर आराम मिळेल.