आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्वादिष्ट तर बनतेच त्याशिवाय आरोग्यासाठीही ते लाभदायक असते. आयुर्वेदात तर हळदीला अमृततुल्य औषधी मानण्यात आले आहे. उत्तम अँटीसेप्टिक म्हणूनही हळदीकडे पाहिले जाते.
- हळद कायम हवाबंद डब्यात ठेवली पाहिजे. हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे हळदीचा स्वाद आणि त्याची गुणवत्ता कमी होत नाही. पोटात जंत झाले असतील तर एक चमचा हळद पावडर दररोज सकाळी एक आठवडाभर पाण्याबरोबर घ्यावे. त्यामुळे पोटातील जंत नष्ट होतील.
- चेह-यावरील डाग, सुरकत्या नष्ट करण्यासाठी हळद आणि काळे तीळ समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवून चेह-यावर लावावी. हळद-दूधाची पेस्ट चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. खोकला आल्यास हळदीचा छोटासा तुकडा चघळावा. त्यामुळे खोकला कमी होतो. त्वचेवरील नको असलेले केस हटवण्यासाठी कोमट खोबरेल तेलात हळद पावडर टाकून त्याची पेस्ट करून हातापायावर लावावे. त्यामुळे त्वचा मुलायम तर होतेच त्याशिवाय त्यावरील नको असलेले केसही हळूहळू कमी होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.