आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : या साधारण घरगुती उपायांनी काळे ओठही गुलाबी होतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळे ओठ ही एक अशी सामान्य समस्या आहे, जी सौंदर्याला प्रभावित करते. यामागचे एक मोठे कारण म्हणजे जास्त प्रमाणात स्मोकिंग करणे हे असू शकते. मुलगा असो किंवा मुलगी गुलाबी ओठांमुळे कोणाच्याही सौंदर्यात भर पडते. परंतु जर ओठ काळे असतील तर आकर्षक चेहराही सुंदर दिसत नाही. ओठांच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा जास्त सजग असतात.

ओठ चांगले दिसण्यासाठी महिला डझनभर कॉस्मॅटिक्स वापरतात. लीप ग्लॉस, लीप बॉम आणि लिपस्टिक यासारखे कॉस्मॅटिक्स थोड्या वेळासाठी ओठांना सुंदर बनवतात परंतु यांच्या जास्त वापराने ओठ काळे आणि ड्राय पडू लागतात. यामुळे ओठांना नेहमी गुलाबी ठेवण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे घरगुती उपाय. घरगुती उपायांनी कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ओठ गुलाबी राहतात.

काळे ओठ गुलाबी करण्याचे उपाय...
- मध आणि लिंबू

लिंबाचा रस आणि मध एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा. हे मिश्रण एक तासभर ओठांना लावून ठेवा. त्यानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून कमीत कमी दोन वेळेस हे मिश्रण ओठांवर लावा. लिंबामुळे ओठांवरील काळसरपणा दूर होईल आणि मधामुळे ओठ कोमल आणि सुंदर होतील.