Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | how to get smart brain tips

PHOTOS : मेंदू तल्‍लख करण्यासाठी हे उपाय करा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 11, 2013, 12:52 PM IST

अशा अनेक क्रिया आहेत, ज्याद्वारे मेंदूची कार्यक्षमता वाढवता येते.

 • how to get smart brain tips

  अशा अनेक क्रिया आहेत, ज्याद्वारे मेंदूची कार्यक्षमता वाढवता येते. तज्ज्ञांच्या मते ज्या कामामध्ये मेंदूचा वापर होतो त्यांचा आपल्या दिनचर्येत अवश्य समावेश केला पाहिजे. अशा पद्धतीने नवीन ब्रेन सेल्स वेगाने विकसित होतात.

 • how to get smart brain tips

  इंटरनेट सर्फिंग
  सर्फिंग करताना मेंदूचे पेशी व्यग्र होतात आणि निर्णयक्षमता व कॉम्प्लेक्स रिझनिंगला नियंत्रित करतात. सर्फिंग करताना वापरकर्ता न्यूरल सर्किट्रीचा वापर करत असल्याचे यूसीएलएच्या संशोधकांना एका संशोधनात आढळून आले आहे. तथापि, असे साधारणत: पुस्तक वाचताना होत नाही.

 • how to get smart brain tips

  ध्यानधारणा
  नियमित ध्यानधारणा केल्याने तणाव तर कमी होतोच, पण मेंदूची कार्यक्षमताही वाढते. बोस्टन येथील मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या एका संशोधनानुसार ध्यानधारणा केल्याने मेंदूच्या कॉर्टेक्स नावाच्या भागाची सक्रियता वाढते. हा भाग स्मरणशक्ती आणि नव्या गोष्टी शिकण्यासाठी व्यक्तीची मदत करतो.

 • how to get smart brain tips

  ओरल हेल्थ
  ब्रिटिश मानसोपचारतज्ज्ञ आणि दंतचिकित्सकाच्या ओरल आणि ब्रेन हेल्थचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. 20 ते 59 वर्षे वयाच्या सुमारे एक हजार लोकांचे संशोधन केले असता ज्या लोकांना दात आणि हिरड्यांशी संबंधित त्रास होता त्यांची आकलन शक्तीदेखील खूप कमकुवत असल्याचे समोर आले. त्यामुळे वर्षातून एक-दोन वेळा दंत चिकित्सकांकडून तपासणी केली पाहिजे.

Trending