आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Prepare Yourself For A Healthy Pregnancy At 35 Years Old

पस्तिशीनंतर गर्भधारणेत उद्भवू शकतात अडचणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वय वाढल्याने महिलांची गर्भधारणेची शक्यता कमी होत चालली आहे. खासकरून पस्तिशीनंतर ही समस्या वाढते. या महिला मर्यादित बीजांडांची निर्मिती करू शकतात. काही महिलांमध्ये डीजनरेशन होते. अशा महिला आयुष्यभरात सुमारे 300 बीजांडांची निर्मिती करण्यात यशस्वी ठरतात. तरुण महिलांची बीजांडे निरोगी असतात. वय वाढल्यामुळे निरोगी बीजांडांची संख्या कमी होऊ लागते. त्यातून मुले जन्मण्याची शक्यताही कमी होते. 37 वर्षे वयापर्यंत सक्षम बीजांडे शरीरातून निघून जातात. काही महिलांच्या अंडाशयात जन्मापासूनच कमी बीजांडे असतात. त्यातून कमी वयात रोगी बीजांडे बाहेर पडतात.
नोकरी-व्यवसाय करणार्‍या महिला उशिरा मातृत्वास पसंती देतात. वर्क-स्ट्रेसमुळे प्रजननक्षमतेची हानी होते. पुरुषांमध्येही वयाबरोबर शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मधुमेहासारख्या लाइफस्टाइल डिसीजमुळे नुकसान होते.
वाढत्या वयात गर्भधारणेची योजना आखण्यापूर्वी चेकअप करा. यात मधुमेह, थायरॉइड डिसआॅर्डर, अ‍ॅनिमिया, इन्फेक्शन, व्हिटामिन टेस्ट करून घ्या. हे आजार आईकडून मुलाला होऊ शकतात. डॉक्टर एफएसएच टेस्ट करतील. एफएसएचची पातळी जास्त असल्यास महिला गरोदर होण्याची शक्यता कमी होते. गर्भपात, उच्च रक्तदाब, मधुमेह असे विकारही गरोदरपणात होऊ शकतात. गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच वेळोवेळी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासणी करा.
- प्रिव्हेन्शन नियतकालिकातून
लेखिका, अध्यक्ष, गायनीवर्ल्ड अँड गायनीवर्ल्ड असिस्टेड फर्टिलिटी युनिट, मुंबई.