आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Betel Leaf Is In Use From Ancient Times As A Digestive Edible

पानाचे 10 फायदे : सर्दी, खोकला,पायरिया आणि इतर आजारातूनही मिळेल मुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विड्याच्या पानांचा वेल असतो. या वेलीला ही पाने लागलेली असतात. संपूर्ण भारतात पान पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या पानांचा उपयोग पूजन कर्म, हवनामध्ये केला जातो. पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते.

- विड्याचे पान मधासोबत खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते. ज्या लोकांना शरीरात थकवा जाणवतो, जास्त घाम येतो अशा लोकांनी दिवसातून कमीत कमी दोन वेळेस मध लावलेले पान खावे. यामुळे शरीरात उर्जा, स्फूर्ती निर्माण होऊन थकवा दूर होतो.

विड्याच्या पानांशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास औषधी उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

या पानांचे खास फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)