आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात तुप खाल्ल्याने राहाल सदैव तरुण, या रोगांसाठी आहे रामबाण उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदात तुपाला स्वाद वाढवणारा आणि ऊर्जाप्रदान मानले जाते. यामुळेच भारतीयांनी तुपाला आपल्या खाद्यातील महत्त्वाचा भाग मानले आहे. तुप फक्त रसायन नाही तर डोळ्यांची ज्योती वाढवतो. थंडीच्या दिवसात तुपाच्या सेवनाचे विशेष महत्त्व आहे. तुपाच्या काही स्वतःच्या गुणांमुळेच बटरऐवजी आपण तुपाचा उपयोग करु शकतो. खरेतर तुपात असे तीन विशेष तत्व आहे ज्यामुळे आपण याचा वापर अवश्य केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हे पचण्यात सोपे असते. हे आपल्या हार्मोनसाठी फायदेशीर असते तर बटरमध्ये लाँग चेन फॅटी अॅसिड असतात, जे हाणिकारक असतात. तुपात फक्त कॅलरीच नसते तर, व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम सारखे अनेक पोषकतत्त्व असतात.

1. अँटीऑक्सीडेंटने भरपूर
तुप तयार करताना तुपाचे तीन लेयर बनतात. पहिला लेयर पाणीयुक्त असतो तो बाहेर काढला जातो. यानंतर शुध्द तुपाचा ठोस भाग काढला जातो, जो आपल्या मागे एक सोनेरी सेचुरेटेड चरबी सोडतो. ज्यामध्ये कंजुगेटेड लाईनोलीक अॅसिड असते. हे कंजुगेटेड लाईनोलीक अॅसिड शरीराच्या संयोजी उतींना लुब्रीकेट करते आणि वजन कमी होण्यापासुन थांबवते. तुप अँटीऑक्सीडेंट गुणांनी युक्त असते.

पुढील स्लाईडवर वाचा... हिवाळ्यात तुप खाण्याच्या काही खास फायद्याविषयी...