PHOTOS : किती / PHOTOS : किती सक्षम आहे तुमची प्रतिकारशक्ती ?

दिव्य मराठी

Jan 31,2013 12:12:00 PM IST

संसर्गजन्य ताप किंवा वारंवार सर्दी-पडसे झाल्याने प्रतिकार प्रणाली (इम्युन सिस्टिम) कमी कार्यक्षम आहे असे म्हणता येणार नाही. प्रतिकारशक्ती कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. ती कमी होऊ नये म्हणून पुढील गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.

पाण्याची कमतरता - शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीराला भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. लघवी पिवळ्या रंगाची होत असल्यास, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे समजावे. चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळेसुद्धा शरीरात डिहायड्रेशन वाढते. याचा इम्युन सिस्टिमवर वाईट परिणाम होतो.वजनात वाढ - अनियंत्रित स्वरूपात वजन वाढायला लागल्यास त्याचा शरीराच्या प्रतिकार प्रणालीवर प्रभाव पडतो. वजन वाढल्याने हार्मोन्समध्ये बिघाड होतो आणि बाहेरून होणार्या संसर्गाचा सामना करण्याची शरीराची क्षमता कमी होते. अशा वेळी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे.तणावात राहणे - ऑफिसमध्ये अतिरिक्त काम आणि वारंवार सर्दी-तापाचा त्रास होत असल्यास याला कामाचा ताण जबाबदार असतो. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार जास्त काळ तणावात राहिल्यास शरीराची प्रतिकारक्षमता कमकुवत होते. सातत्याने तणावात राहिल्यास प्रतिकारक्षमता वाढत नाही.कोल्ड्रिंक्स आणि पांढर्या रक्तपेशी - अमेरिकन र्जनल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिन्शसच्या संशोधनानुसार कोल्ड्रिंक्समधील 100 ग्रॅम साखरेचे सेवन (जे दोन कोल्ड्रिंक्समध्ये असते) केल्यास शरीरातील पांढर्या पेशींवर विपरीत परिणाम होतो. कोल्ड्रिंक्स घेतल्याच्या पाच तासांत पांढर्या पेशींचे नुकसान होण्याची क्रिया सुरू होते. म्हणून कोल्ड्रिंक्स पिणे टाळले पाहिजे.

पाण्याची कमतरता - शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीराला भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. लघवी पिवळ्या रंगाची होत असल्यास, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे समजावे. चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळेसुद्धा शरीरात डिहायड्रेशन वाढते. याचा इम्युन सिस्टिमवर वाईट परिणाम होतो.

वजनात वाढ - अनियंत्रित स्वरूपात वजन वाढायला लागल्यास त्याचा शरीराच्या प्रतिकार प्रणालीवर प्रभाव पडतो. वजन वाढल्याने हार्मोन्समध्ये बिघाड होतो आणि बाहेरून होणार्या संसर्गाचा सामना करण्याची शरीराची क्षमता कमी होते. अशा वेळी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे.

तणावात राहणे - ऑफिसमध्ये अतिरिक्त काम आणि वारंवार सर्दी-तापाचा त्रास होत असल्यास याला कामाचा ताण जबाबदार असतो. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार जास्त काळ तणावात राहिल्यास शरीराची प्रतिकारक्षमता कमकुवत होते. सातत्याने तणावात राहिल्यास प्रतिकारक्षमता वाढत नाही.

कोल्ड्रिंक्स आणि पांढर्या रक्तपेशी - अमेरिकन र्जनल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिन्शसच्या संशोधनानुसार कोल्ड्रिंक्समधील 100 ग्रॅम साखरेचे सेवन (जे दोन कोल्ड्रिंक्समध्ये असते) केल्यास शरीरातील पांढर्या पेशींवर विपरीत परिणाम होतो. कोल्ड्रिंक्स घेतल्याच्या पाच तासांत पांढर्या पेशींचे नुकसान होण्याची क्रिया सुरू होते. म्हणून कोल्ड्रिंक्स पिणे टाळले पाहिजे.
X
COMMENT